कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या छावणी परिषद परिसरातील कामठी कॅन्टोन्मेंट चे सी ओ अभिजित सानप यांच्या बंगल्यावरील शासकीय सेवेत असलेल्या सुरक्षा रक्षकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज 21
एप्रिल ला सकाळी 7 दरम्यान निदर्शनास आली असून मृतक सुरक्षारक्षकाचे नाव रमेश केशवराव भोतकर वय 56 वर्षे रा मोदी पडावं न्यू खलाशी लाईन कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा नेहमीप्रमाणे कर्तव्य बजावण्यासाठी रात्री 11 वाजता रात्रपाळीच्या नोकरीला घरून निघाले असता सकाळी चक्क त्यांचा मृत्यू झाल्याचे नोंदर्शनास आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे त्यातच त्याच्या चेहऱ्यावर रक्ताने माखलेले डाग सह लाल रंगाच्या मुंग्याने चांगलाच चावा घेतला आहे.मृतकाची परिस्थिती बघता कदाचीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा किंवा त्याच्यावर कुणी अज्ञात मारेकऱ्यांनो हल्ला केला असावा अशा विविध चर्चेला नागरिकांत उधाण आहे त्यामुळे मृत्यूचे कारण हे अजूनही गुलदस्त्यात असून
या संशयास्पद मृत्यूची पोलीस चौकशी सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी पोलीस स्टेशन चे अधिकारी कर्मचाऱ्यांनो छावणी परिषद चे मुख्याधिकारी च्या बंगल्यावरील घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनार्थ शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र वरिष्ठांच्या आदेशांनव्ये मृत्यूचे मुख्य कारण कळणे तसेच मृतकाची कोरोना संदर्भात असलेली संशयास्पद स्थिती संदर्भात मृतदेह नागपूर च्या मेयो इस्पितळात हलविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.मृतकाच्या पाठीमागे आई, पत्नी व 2 मुले असा आप्तपरिवार आहे मात्र या घटनेने छावणी परिषद परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर मृतकाच्या कुटुंबात नैराश्येचे वातावरण पसरले आहे.
संदीप कांबळे कामठी