नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.28) 8 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ आणि गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 9 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धरमपेठ झोन अंतर्गत गोकुलपेठ बाजार येथील आझाद किराणा स्टोअर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत नंगा पुतला चौक येथील निलम नॉव्हेल्टी आणि क्वेटा कॉलनी येथील सुगंध भंडार या दुकानांविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत गणेश विघ्नहर्ता अपार्टमेन्ट येथील Yakhani Biryani यांच्याविरुध्द रस्त्यालगत हॉटेलचा कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच आठ रस्ता चौक येथील ध्रुव पॅथोलॉजी यांच्याविरुध्द रस्त्यालगत दुकानाचा कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत सेन्ट्रल बाजार, रामदासपेठ येथील Next Level Transaction यांच्याविरुध्द अनधिकृत जागेवर कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
तसेच रामदासपेठ येथील IDFC First Bank यांच्याविरुध्द अनधिकृत जागेवर ऑफीसचा कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत एम्प्रेस मॉल, गणेशपेठ येथील स्मार्ट बाजार यांच्याविरुध्द परवानगीशिवाय रस्त्यालगत बॅनर/होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.