नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.15) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 31 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 220 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत बजेरिया, रेल्वे स्टेशन जवळील R.V.Udhyog आणि अग्रेसन चौक येथील आशिष ट्रेडर्स यांच्याविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत व्हीएनआयटी रोड, बजाजनगर येथील The Pixie Bee Caffee यांच्याविरुध्द दुकानातील कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत उमरेड रोड, दिघोरी येथील महेश बार ॲण्ड रेस्टॉरेन्ट यांच्याविरुध्द रेस्टॉरेन्टचा कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून 6 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशिनगर झोन अंतर्गत इन्दोरा मैदान, जरिपटका येथील खंडारे स्क्रॅप शॉप यांच्याविरुध्द रस्त्यालगत भंगार साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.