नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.28) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 3 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल सतरंजीपूरा झोन अंतर्गत प्रभाग न.5, जानदारवाडी येथील यश सोनपापडी आणि प्रभाग न.05 मंगलवारी येथील क्रीष्णा फुड एजन्सी या दोन्ही दुकानाविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत फ्रेण्डस कॉलोनी, काटोल रोड येथील हॉटेल पार्क गार्डेनीया यांच्याविरुध्द हॉटेलचा कचरा अनधिकृत ठिकाणी टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत सीए रोड, मेयो हॉस्पीटल जवळील मातोश्री फार्मसी यांच्याविरुध्द बायो-मेड कचरा अनधिकृत ठिकाणी जाळल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.