Published On : Sat, May 6th, 2023
By Nagpur Today Nagpur News

‘वाह ताडोबा’…जंगल सफारीत वाघोबाचे दर्शन होताच सचिन तेंडुलकरच्या भावना व्यक्त !

Advertisement

नागपूर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी नुकतीच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाला भेट दिली. ताडोबा भेटीत वाघोबाचे दर्शन होताच ‘वाह ताडोबा’ सचिन तेंडुलकर यांनी आपला भावना व्यक्त केल्या आहेत. आज पुन्हा ते कुटुंबियांसह सफारी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सचिन हे पत्नी अंजली आणि मित्रांसोबत मुंबईवरून गुरुवारी नागपुरात दाखल झाले. वन्यजीवांच्या दर्शनाने सुखावलेले सचिन शुक्रवारी सकाळी याच गेटमधून पुन्हा सफारीला निघाले. काही वेळातच त्यांना वाघाने दर्शन दिले. यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. दरवर्षी प्रमाणे यंदाही सचिन यांनी ताडोब्याला भेट दिली. सध्या पावसाळी वातावरण असल्याने वाघ दिसण्याची शक्यता कमी असते. पण, सचिन यांना दोन्ही सफारीत वाघ्रदर्शन झाल्याची माहिती आहे.

Today’s Rate
Saturday 05 Oct. 2024
Gold 24 KT 76,100/-
Gold 22 KT 70,800/-
Silver / Kg 93,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सचिन यांची ताडोब्याही ही दुसरी भेट असून ते फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात याठिकाणी आले होते. कोलार, मदनापूर व अलिझंजा अशा वेगवेगळ्या गेटमधून त्यांनी व्याघ्रसफारी केली. यादरम्यानही त्यांनी अनेक वन्यप्राण्यांचे दर्शन केले होते. ‘ताडोब्यातील अनुभव थरारक होता. हे जंगल योजनाबद्ध आहे. क्षेत्र संचालकांपासून गार्ड आणि कर्मचाऱ्यांचे आभार,’ असा संदेश लिहित लवकरच परत येणार असल्याचे ते म्हणाले होते. यानंतर आता लगेचच मे महिन्यात सचिन ताडोबा जंगल सफारीला आहे आहेत.

Advertisement