Advertisement
चंद्रपुरातील ताडोबा अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये वाघिणीची शिकार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर
इतिहासात पहिल्यांदाच ताडोबा अभयारण्यात अशी घटना घडल्याने वाघांच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण
नेमकं प्रकरण काय? :
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमधील खातोडा गेट परिसरात ही घटना घडली. हा भाग सामान्य लोकांसाठी पूर्णपणे प्रतिबंधित आहे. एवढी सुरक्षाव्यवस्था असताना देखील या भागात शिकाऱ्यांनी शिरकाव केला आणि तारांचे फासे लावले हे विशेष. ज्यामध्ये अडकून दोन वर्षीय वाघिणीचा मृत्यू झाला
या घटनेनंतर वन्यजीव प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे
वाघीण मृत्यू प्रकरणाची दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सखोल चौकशीचे दिले आदेश