ताजबाग ट्रस्ट कडून रु 32 लक्ष चा थकीत मालमत्ता कर बाबत धनादेश प्राप्त झाल्यामुळे नेहरू नगर झोन 5 चे सहा आयुक्त श्री विकास रायबोले यांनी हजरत बाबा ताजूद्दिन कॅमेटी चे श्री ताज अहमद राजा यांचे पुष्पगुछ देऊन सत्कार केले.
वर्ष 2013 पासून हजरत बाबा ताजुद्दिन कॅमेटी, मोठा ताजबाग, नागपूर यांच्या मालकीच्या एकूण 4 मिळकतीवर मालमत्ता कर रु 32 लक्ष व त्या वर शास्ति रु 19 लक्ष असे एकूण रु 51 लक्ष थकीत होते.
या संबंधाणे सदर थकीत मालमत्ता कर वसूली बाबत नेहरू नगर झोन 5 कार्यालयाचे पाठलाग सुरू होते, त्या संबंधाणे आज दिनांक 23/01/2025 रोजी सदर थकीत मालमत्ता कर वसूल करण्याकरिता मौक्यावर गेलो असता या हजरत बाबा ताजूद्दिन कॅमेटी चे श्री ताज अहमद राजा यांनी तत्काळ 4 धनादेश मिळवून रु 32 लक्ष चा मालमत्ता कराचा भरणा केला.
सदर ची कार्यवाई नेहरू नगर झोन 5 चे सहा आयुक्त श्री विकास रायबोले यांच्या नेतृत्वात कर अधीक्षक श्री संजय कापगते, श्री दीपक स्वामी श्री सचिन मेश्राम, श्री विजय मेश्राम व कर संग्राहक श्री पराग भेंडे यांनी केली.