नागपूर: नागपूर शहरातील ज्या मालमत्ता धारकांनी अनेक वर्षापासून मालमत्ता कर भरला नाही अशा थकबाकीदारांवर कारवाई करा, असे सक्त निर्देश नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी (ता.१५) दिले.
नागपूर शहरातील कर वसूली संदर्भात मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात बुधवारी (ता.१५) आढावा बैठक पार पडली.
बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्यासह उपायुक्त श्री.मिलिंद मेश्राम, प्रकाश वराडे, गणेश राठोड, अशोक गराटे, सहायक आयुक्त् सर्वश्री हरीश राउत, घनश्याम पंधरे, नरेंद्र बावनकर, विकास रायबोले, विजय थूल, प्रमोद वानखेडे, यांच्यासह दहाही झोनचे कर संग्राहक, कर अधिक्षक उपिस्थत होते.
कर संकलनासाठी नागपूर महानगरपालिकेने महत्वाकांक्षी अभय योजना सुरु केली आहे. मालमत्ता कर वसूल करण्याकरिता अधिकाअधिक वेग वाढविण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी दिले आहे. याशिवाय करसंग्रह आणि मालमत्ता जप्ती करण्याकरिता झोन सहायक आयुक्तांनी नियोजन करावे. त्याचे वारंवार पुनरावलोकन करावे. याकरिता कर विभागाला आवश्यक मनुष्यबळ आणि वाहने देणयात यावी. मालमत्ता कर थकित रक्कम वसुल होणेस्तव वारंट कार्यवाही करावी , वारंट कार्यवाही मध्ये थकित रक्कम वसुल होत नसल्यास संबधित थकबाकीदाराची स्थावर / जगंम मालमत्ता जप्ती व अटकावणी प्रत्येक दिवशी करुन उपायुक्त
(महसुल)कार्यालय म न पा कडे दैनंदीन अहवाल सादर करावा व केलेल्या कार्यवाहीची दैनंदीन प्रसिद्धि देण्यात यावी. मालमत्ता धारकांनी थकित पैसे भरले तर त्यांचे अभिनंदन करावे, अभय योजनेचा लाभ आतापर्यंत किती लोकांनी घेतला, किती लोक घेऊ शकतात, कोणत्या भागात अधिक कर वसूल करता येईल यावर लक्ष देण्यात यावे, ज्या कर निरीक्षक व कर संग्राहकची उदिष्ठाच्या तुलनेत ४०% पेक्षा कमी वसूली आहे त्यांचेवर कार्यवाही प्रस्तुत करणेचे सक्त निर्देश अतिरिक्त आयुक्त गोयल यांनी यावेळी बैठकीत दिले.