Advertisement
मुंबई: महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिंद्रे-गोरे प्रकरणाच्या चौकशीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत टकले यांनी लक्षवेधी सूचना मांडत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
पोलीस दलात असलेल्या महिलेची अशाप्रकारे झालेल्या हत्येमुळे राज्यातील जनतेच्या मनात असंतोष पसरलेला आहे. या हत्येला जबाबदार असलेले पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर व इतर संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी हेमंत टकले यांनी या लक्षवेधीद्वारे केली.
दरम्यान अश्विनी बिंद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांची नियम तपासून त्यांना बडतर्फ करण्यात येईल. तसेच त्यांचे राष्ट्रपती पदक परत घेण्यासाठी शिफारस करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल असे उत्तर गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आमदार हेमंत टकले यांच्या लक्षवेधीवर दिले.