Published On : Mon, Aug 21st, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात तलाठी भरतीच्या परीक्षेचे सर्व्हर डाऊन; परीक्षार्थी संतापले, परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ !

Advertisement

नागपूर : राज्यात आजपासून तलाठी भरतीची परीक्षा सुरु झाली आहे. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन असल्याची समस्या येत आहे. सोमवारी सकाळी ९ वाजताच्या पेपरसाठी उमेदवार परीक्षा केंद्रावर गेले असता सर्व्हर डाऊन असल्याने परीक्षा केंद्राबाहेर मोठा गोंधळ उडाला.

नागपूर येथील एमआयडीसी परिसरातील केंद्राबाहेर हा प्रकार घडला. असाच प्रकार अमरावतीमध्येही घडल्याची माहिती आहे. या प्रकाराने परीक्षार्थ्यांमध्ये संतापची लाट पसरली आहे. असाच प्रकार अमरावतीमध्येही घडल्याची माहिती समोर आली.

दरम्यान राज्यात यंदा चार वर्षांनंतर तलाठी भरती परीक्षा होत असून याकरिता लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केला आहे. गुरुवार १७ ऑगस्टपासून राज्यातील विविध केंद्रांवर या परीक्षेला सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजता पहिल्या टप्प्याची परीक्षा होती. याचवेळी पेपरसाठी उमेदवार परीक्षा केंद्रावर गेले असता सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने ९ वाजता नंतरही विद्यार्थ्यांना बाहेरच उभे ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

Advertisement