Published On : Tue, Sep 10th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला अटक

-एसएमएस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील घटना
Advertisement

नागपूर: नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला सदर पोलिसांनी अटक केली आहे.एसएमएस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील ही घटना असून संकल्प वीरेंद्र मेढा( वय 47 वर्ष रा. मेढा भवन 35 सेंट्रल रोड, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

माहितीनुसार,आरोपी शिक्षक हा नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. विद्यार्थांशी अभद्र बोलणे त्यांना पाण्याच्या बॉटल्स आणि डस्टर फेकून मारणे, शिवीगाळ आणि धमकी देणे असे कृत्य तो करीत होता. विद्यार्थ्यांपासून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी तीन सदस्य समिती तयार करून आरोपी शिक्षक संकल्प मेढा याची चौकशी केली असता यात तो दोषी आढळला.यानंतर एस एम एस हायस्कूलचे प्राध्यापक सॅम्युएल कारावालिया यांनी दिलेल्या तक्रारनुसार सदर पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement