मुंबई : राज्यात शिक्षक भरती संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मोठी घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती (Teachers Recruitment) केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल, अशी माहिती केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना दिली.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्यासंदर्भात आम्ही प्रयत्नशील आहोत. पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. आधार वेरिफिकेशन विद्यार्थ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकडा समोर येणार असल्याचे केसरकर म्हणाले.
शंभर टक्के शिक्षक भरती होणार आहे. त्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे. कारण आरक्षणानुसार ही पद भरती होईल. या उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यांची भरती करण्यात येणार असल्याचेही केसरकर म्हणाले.