Published On : Sun, Jun 30th, 2024

टीम इंडियाने रचला इतिहास;आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर कोरले नाव, नागपूरसह देशभरात जल्लोष!

Advertisement


मुंबई: भारतीय क्रिकेट टीमने इतिहास रचत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली. क्रिकेटर हार्दिक पंड्याने हेन्रिक क्लासेन याला आऊट करत टीम इंडियाला कमबॅक करुन दिले. त्यानंतर सूर्यकुमार यादव याने गेमचेंजिंग कॅच घेतला. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं आणि दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी शानदार विजय मिळवला.

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचं आव्हन दिले होते. मात्र भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 169 धावांवर रोखले. देशभरासह नागपुरातही या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. शहरातील धरमपेठ भागात एकत्र येत क्रिकेटप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.भारताचा तिरंगा फडकवत क्रिकेटप्रेमींनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट टीमने सुरुवातीला टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 176 धावा केल्या.

विराट कोहली याने सर्वाधिक 76 धावा केल्या. तर अक्षर पटेल याने 47 रन्स केल्या. शिवम दुबेने 27 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन रोहित शर्माने 9, रवींद्र जडेजाने 2 आणि हार्दिक पंड्याने 5* धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि एनरिख नॉर्खिया या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मार्को जान्सेन आणि कगिसो रबाडा या दोघांना 1-1 विकेट मिळाली.

Advertisement