Published On : Wed, May 13th, 2020

कोरोना लढ्यात माहिती लपविणाऱ्यावर गुन्हा दाखल होणार-तहसीलदार हिंगे

कामठी :-कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी 23 मार्च पासून लॉकडाउन लागू करण्यात आले असून कामठी तालुका प्रशासनाच्या वतीने केलेल्या उपयोजना तसेच मार्गदर्शक सुचनेतून सद्यस्थितीत कामठी तालुका कोरोनामुक्त असला तरी कोरोनाचा शिरकाव न होवो यासाठी प्रशासन काटेकोर प्रयत्न करीत आहेत तेव्हा या कोरोना विषाणूच्या लढाईत प्रशासनाला सहकार्य करा तर या कोरोना लढाईत बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी कामठी तालुक्यात आल्याची माहिती शहरवासीयांनी कामठी नगर परिषद , पोलीस स्टेशन व ग्रामीण भागातील नागरिकांनी संबंधित ग्रा प तसेच कामठी तहसील कार्यालयात माहिती दिल्याशिवाय स्वगृह गाठू नये .

माहिती न देता , घरात होम कोरोनटाईन न राहता इतरांच्या संपर्कात आल्यास माहिती लपविल्या प्रकरणी आपल्यावर 500 रुपये दंड ठोठावून भादवी कलम 188, 269, 270 अनव्ये गुन्हा नोंदवीत नागपूर ला शास्कोय विलीगिकरन कक्षात पुढील 14 दिवसासाठी दाखल करण्यात येईल तेव्हा कामठी तालुक्यातील काही नागरिक बाहेर अडकून असून आता सोयीनुसार तालुक्यात प्रवेश केले असल्यास प्रशासनाला प्रवासाची माहितो देऊन घरातच 14 दिवस होम कोरोनटाईन करून राहणे बंधनकारक आहे तसेच याबाबत नगर परिषद मदत केंद्र क्र 8669860664, 8554008485, 9552467887 तसेच कामठी तहसील कार्यालय मदत क्र 8180827675 वर माहिती द्यावी असे आव्हान कामठी तहसीलदार अरविंद हिंगे, मुख्याधिकारी रमाकांत डाके तसेच बीडीओ सचिन सूर्यवंशी, व पोलीस विभागाने केले आहे

Gold Rate
Saturday 25 Jan. 2025
Gold 24 KT 80,700/-
Gold 22 KT 75,100/-
Silver / Kg 92,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement