Published On : Fri, Jul 9th, 2021

टेकडी गणेश मंदिर उड्डाणपूल दुकानदारांना मनपाने मोबदला द्यावा

Advertisement

ना. गडकरींनी घेतला विविध प्रकल्पांचा आढावा

नागपूर: टेकडी गणेश मंदिरासमोरील उड्डाणपुलाखालील दुकानदारांचे पुनर्वसन करून त्यांना दुकानांच्या बदल्यात जागा किंवा पैसे पाहिजे असतील, त्याचा मोबदला मनपाने द्यावा, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज मनपाला दिले.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आज ना. गडकरी यांनी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, मेट्रोचे ब्रजेश दीक्षित, नासुप्र सभापती, नासुप्रचे सूर्यवंशी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व अनेक अधिकारी उपस्थित होते. हा उड्डाणपूल बांधण्यासाठी रेल्वे, मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभागात सामंजस्य करार होणे आवश्यक असल्याचे मत काही अधिकार्‍यांना या बैठकीत व्यक्त केले. पण या पुलाच्या कामाचे नियोजन मेट्रोकडे देण्यात यावे अशी सूचना ना. गडकरी यांनी केली.

सध्या या उड्डाणपुलाखाली असलेल्या दुकानदारांशी मनपाने 30 वर्षाचा लीज करार केला आहे. यापैकी 10 वर्षे निघून गेली आहेत. या दुकानदारांना आता हटविले तर त्यांना मोबदला द्यावा लागणार आहे. एक तर अन्य जागेवर दुकान किंवा पैसा देऊन त्यांचे पुनर्वसन करा, असे ना. गडकरी यांनी अधिकार्‍यांना सांगितले.

सध्याच्या उड्डाणपुलामुळे रेल्वे स्टेशनचा विस्तार खोळबंला आहे. स्टेशनच्या विस्तारासाठी आज जागा नाही. योग्य तर्‍हेने विस्तार करून या परिसराचे सौंदर्य अधिक वाढविण्यासाठी मनपाने नियोजनाचे काम मेट्रोकडे द्यावे. तसेच ज्या जागांचे अजून भूसंपादन करणे आवश्यक आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.
आजच्या बैठकींदरम्यान ना. गडकरींचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या ब्रॉडगेज मेट्रोच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. ना. गडकरींची ही संकल्पना केरळ या राज्याने उचलली असून त्यांनी ब्रॉडगेज मेट्रो या प्रकल्पावर कामही सुरु केल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

फुटाळा पार्किंग प्लाझा
फुटाळा सौंदर्यीकरण प्रकल्पात तयार होणार्‍या रंगीत फाऊंटेनच्या कामाचा आणि पार्किंग प्लाझाचा आढावा आज ना. गडकरी यांनी घेतला. 6 हजार चौ. मीटरवर पार्किंग प्लाझा तयार करण्यात येणार आहे. चार मजली ही इमारत राहणार आहे. या जागेचे पैसे मेट्रोने नासुप्रला द्यावा अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

अ‍ॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर
दाभा येथे मेट्रो, पंकृवि आणि सार्वजनिक बांधकाम या विभागांमार्फत अ‍ॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येत आहे. या सेंटरसाठी विद्यापीठाची 14250 चौ. मी. जागा जाणार आहे. ही जागा ताब्यात घेणे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने जागेला कुंपण करणे, रस्ते सपाटीकरण करणे ही कामे प्राथमिक अवस्थेत करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली.

केळीबाग रोड
केळीबाग रोडच्या कामासंबंधीचा आढावा ना. गडकरी यांनी यावेळी घेतला. या रस्तावरील 68 मालमत्तांपैकी 58 मालमत्ता हटविण्यात आल्या. मॉडेलमिलपर्यंत 4 ते 5 मालमत्तांचा अडसर आहे. पण तोही लवकरच दूर केला जाईल. या रस्त्यावर येणार्‍या घरांमधील भाडेकरूंचा प्रश्न न्यायालयात आहे. ज्यांना जागेचा, घरांचा मोबदला दिला गेला नाही. त्यांना त्वरित देण्यात यावा, असे निर्देशही देण्यात आले. या रस्त्यासाठी भूसंपादनाचे काम जिल्हाधिकार्‍यांनी करून द्यावे, असेही ना. गडकरी म्हणाले. 3 महिन्यात जागेचे भूसंपादन करून मोबदला देता येईल अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली.

Advertisement
Advertisement