जाहिरात क्षेत्रातील संस्था घेऊ शकतात लाभ
नागपूर: नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत नॉन-फेयर रेव्हेन्यू बॉक्स या अनोख्या संकल्पनेच्या माध्यमाने महा मेट्रोने आर्थिक स्रोत मांडले आहेत. यात प्रामुख्याने ट्रेन रॅपिंग, स्टेशन सेमी-नेमिंग, स्टेशनवर व्यावसायिक कामांकरिता जागा उपलब्ध करून देणे, मेट्रो परिसरात असलेल्या स्क्रीनवर जाहिरात देणे अश्या अनेक माध्यमाने महा मेट्रो महसूल मिळवीत आहे. या विविध योजनांना व्यापारी वर्गाने अनुकूल प्रतीसाद दिला आहे.
याच शृंखलेत आता महा मेट्रोने मेडियन मिडीयन मेंटेनंस निविदा (रस्ते दुभाजक देखभाल संबंधी निविदा) प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यामध्ये महा मेट्रोच्या रिच-१ (सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन) आणि रिच-३ (सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन) दरम्यान असलेल्या मिडीयन (दुभाजक) च्या रखरखाव संबंधी हि निविदा असून या करता जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था या प्रक्रियेत निविदा भरून सहभागी होऊ शकतात.
महा मेट्रोने प्रसिद्ध केलेल्या निविदे प्रमाणे दोन पिलरच्या मध्ये असलेल्या जागेवर संबंधीत संस्था किंवा कंपनी जाहिरात फलक लावू शकते. कंत्राट मिळालेली कंपनीला ४८+४८ (दोन्ही बाजूने) चौरस फूट क्षेत्रफळ जागेत जाहीरात फलक लावता येईल. दोन पिलरच्या मध्ये असणाऱ्या जागेवर सदर फलक लावता येईल आणि त्यानंतरचे दोन पिलर सोडून म्हणजेच (अल्टर्नेट) त्या पुढल्या दोन पिलरच्या मध्ये असलेल्या जागेवर फलक लावता येईल. कंत्राट मिळालेल्या संस्थेवर मिडीयनच्या रखरखावची जबाबदारी तसेच महा मेट्रोने निर्मित केलेले व्हर्टिकल गार्डन आणि दुभाजक सौंदर्यीकरण करण्याची जबाबदारी देखील त्या संस्थेची असेल.
महत्वाचे म्हणजे नागपूर महानगर पालिकेच्या आउट डोअर जाहिरात संबंधीच्या धोरणांतर्गत महा मेट्रोला अश्या प्रकारे जाहिरातिचा परवाना मिळाला आहे. निविदा भरण्याची अंतिम तारीख १६ जून आहे. या निविदेची अधिक माहिती महा मेट्रोच्या संकेत स्थळावर उपलब्ध असून संबंधितांनी त्याचा लाभ घ्यावा हे आवाहन महा मेट्रो तर्फे केले जात आहे.