Advertisement
नागपूर : चंद्रपूर: नागपूरहून चिमूरला जाणारी एसटी महामंडळाची बस एका भीषण रस्ते अपघाताला बळी पडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या भीषण अपघातात २२ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले.
जखमी प्रवाशांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अपघात कसा झाला याचा तपास सुरू आहे.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु सुरुवातीच्या अंदाजानुसार, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. जखमी प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले असून अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.