Advertisement
नागपूर : भिवापूर तालुक्यातील बेला पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिला मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 13 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांवर नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात उपचार सुरु आहे.
माहितीनुसार, भिवापूर तालुक्यातील बेला पोलीस स्टेशनच्या हद्दीत टाटा सुमोचा भीषण अपघात झाला. कामगार महिला कामानिमित्त बेला पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
या अपघाताचा तीन महिलांचा मृत्यू झाला असून काही महिला जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून ते याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.