नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत १०० कोटी रुपयांची खंडणी मागणारा दहशतवादी जयेश पुजारी याची न्यायालयाच्या आदेशानंतर नागपूर कारागृहातून पुन्हा बेळगाव तुरुंगात रवानगी करण्यात आली.
जयेश याने १४ जानेवारी आणि २१ मार्च रोजी त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात फोन करून खंडणीची मागणी केली होती. तसेच पैसे दिले नाही तर ठार मारू अशी धमकीही त्याने दिली. नागपूर पोलिसांनी त्याला २८ मार्च रोजी बंगळुरू तुरुंगातून प्रोडक्शन वॉरंटवर अटक करून नागपूरच्या कारागृहात दाखल केले. चौकशीदरम्यान त्याचा दहशतवादी संघटनांशी संबंध असून दहशतवादी घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे समोर आले होते.
आरोपी जयेशवर र्नाटकात अनेक गुन्हे दाखल असून त्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांचाही तपास सुरु आहे.त्यामुळे त्याला बुधवारी रात्री आठ वाजता विमानाने बेळगावला नेण्यात आले असून त्याला पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.