बारावी आणि पदवीनंतर करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. या विविध करिअर पर्यायांची माहिती शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य स्वयम् सामाजिक संस्था व माय करिअर क्लब सन 2015 पासून सातत्याने करीत आहे. याशिवाय विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच युवक- युवतींच्या कलाकौशल्याला वाव मिळावा आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने अनेक उपक्रम राबविले. विदर्भातील जिल्हा, तालुका व गावस्तरावरील अनेक शाळा-महाविद्यालयांत थेट जाऊन विद्यार्थ्यांचे कौन्सिलिंग देखील केले.
शासकीय सेवेत दाखल होण्याचा राजमार्ग म्हणजे स्पर्धा परीक्षा होय. युवकांची शैक्षणिक पात्रता, मेहनत करण्याची तयारी, प्रतिभाशक्ती, सातत्य या बाबींवर स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास यश मिळवता येते. त्याकरिता दर्जेदार स्टडी मटेरियल देखील आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणा-या युवक-युवतींची गरज लक्षात घेऊन स्वयम् सामाजिक संस्था व माय करिअर क्लबच्या माध्यमातून टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिली जात आहे. माय करिअरची टेस्ट सिरीज सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून स्पर्धा परीक्षा अॅकेडमींना ती अत्यल्प शुल्कामध्ये तयार करून दिली जाते.
राज्यातील युवकांचा पोलीस भरती, तलाठी भरती, लिपिक भरती, एमपीएससी भरती व आर्मी भरतीकडे मोठा कल आहे. पोलीस भरतीमध्ये शारीरिक चाचणीनंतर लेखी परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षेत मेरिट गुण मिळविल्यानंतर त्याची नियुक्त होते. माय करिअरने सुरू केलेल्या टेस्ट सिरीजचा राज्यातील हजारो युवक-युवतींना मदत होत आहे. त्यामुळेच विदर्भासह खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागांतून माय करिअरच्या टेस्ट सिरीजला फार मोठी मागणी आहे. यासोबतच तलाठी भरती, एमपीएससी कंबाईन ग्रुप-सी टेस्ट सिरीजला देखील युवकांनी पसंती दर्शविली आहे. माय करिअरची टेस्ट सिरीज ही संबंधित स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित असते.
याशिवाय त्यामध्ये चालू घडामोडींचे प्रश्न समाविष्ट असतात. त्यामुळे परीक्षार्थ्यांना प्रत्येक घटकाचा अभ्यास करणे सोपे जाते. जो युवक प्रथतः परीक्षेला सामोरा जात आहे, अशांसाठी सोपी व ज्यांनी यापूर्वी परीक्षा दिल्या आहेत अशांकरिता कठीण पातळीवरील टेस्ट पेपर माय करिअरकडून तयार केले जातात. म्हणजेच परीक्षार्थ्यांचा स्तर लक्षात घेऊन टेस्ट पेपरची रचना केली जाते.
बारावीनंतर युवकांचा सैन्य भरतीकडे मोठ्या प्रमाणात ओढा असतो. यामध्ये विशेषतः ग्रामीण भागातील युवकांची मोठी संख्या असते. आर्मी अग्निवीर भरतीमध्ये जीडी, टेक्निकल व क्लर्क अशा प्रकारची पदभरती होते. हिंदी माध्यमातून घेतल्या जाणा-या या परीक्षांचे टेस्ट पेपर माय करिअरने उपलब्ध करून दिले आहेत. अनेक युवकांचे आर्मीमध्ये भरती होण्याचे स्वप्न असते. मात्र, पुरेशा मार्गदर्शनाअभावी तो मागे पडतो. म्हणूनच अशा युवकांसाठी माय करिअरने टेस्ट पेपर सुरू केले आहेत. मैदानी चाचणीनंतर 50 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते. आर्मी भरतीच्या अभ्यासक्रमावर आधारित अग्निवीर टेस्ट पेपर उलबध आहेत. शहरी तसेच गावखेड्यांतील तरूण आपल्या कष्टाच्या बळावर मोठ्या संख्येने आर्मीमध्ये रूजू व्हावेत व त्यांनी देशसेवा करून देशासह आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे, हीच अपेक्षा आहे.