Published On : Sat, Jan 11th, 2025
By Nagpur Today Nagpur News

मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार; संजय राऊतांची घोषणा

Advertisement

विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाला तर महाविकास आघाडीला अपयशाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये वाद पेटला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे.

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत लढणार नसल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. मुंबई, ठाणे, नागपूर, पुण्यासह सगळीकडे स्वबाळवर लढणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. एकदा आम्हाला आजमवून पाहायचे असल्याचे राऊत म्हणाले.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकट्याने लढणार असल्याने राऊतांनी स्पष्ट केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनीही पालिका निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असल्याचे राऊत म्हणाले.

नागपूरमध्येही आम्ही स्वबळावर लढणार –
नागपूरलासुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसेना शहरप्रमुखांशी आम्ही चर्चा केली. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरबाबत आमचं ठरत आहे. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगर पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायतीमध्ये स्वबळावरुन लढून आपआपले पक्ष मजबूत करावेत, असे संजय राऊत म्हणाले.

Advertisement
Advertisement