मुंबई: शिवसेनेच्या आमदार अपात्रता मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने निकाल दिला. नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या सूत्राच्या बाहेर जाऊन निर्णय दिल्याने त्याला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका ठाकरे गटाच्या वतीने १५ जानेवोरी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी ठेवण्यात आली होती.
आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून या प्रकरणावर पुढील सुनावणी २२ जानेवारी, सोमवारी सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या ज्येष्ठ वकिलांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्याकडे मागणी केली. ही मागणी मान्य झाली असून आता सोमवारी सुनावणी होणार आहे.
शिवसेना सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गेल्या आठवड्यात निर्णय देताना शिंदे गटाला दिलासा दिला होता. दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवीत शिवसेना पक्ष शिंदे यांचाच, असा निर्वाळा दिला होता. नार्वेकर यांच्या निकालाच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.