Published On : Mon, Mar 20th, 2017

दोन मुलांसह १५व्या मजल्यावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या

Advertisement


ठाणे:
पतीसोबत सतत होत असलेल्या भांडणाला कंटाळलेल्या एका महिलेने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेने आपल्या दोन मुलांना आधी इमारतीच्या १५व्या मजल्यावरून फेकले त्यानंतर स्वत: उडी घेतली. यात महिलेचा आणि तिच्या एका मुलाचा मृत्यू झालाय तर एक मुलगा सुदैवाने वाचला आहे. मात्र तो गंभीर जखमी आहे. सकाळी डायघर शिबलीनगर येथील दोस्ती कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी ही घडली. शनिवारी महिलेचे पतीबरोबर भांडण झाले होते, असे पोलीसांनी सांगितले.

शिरीन हनीफ खान (२६) असे या महिलेचे नाव असून ही महिला मुंब्रा कौसा येथील रशीद कंपाऊंड परिसरातील हिल व्ह्यू अपार्टमेंटमध्ये कुटुंबासह राहत होती. तिला तौसिफ (७) आणि आमरीन (४) ही दोन मुले आहेत. रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिरीन आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन शिबलीनगर येथील दोस्ती कन्स्ट्रक्शनच्या इमारतीत घर पाहण्यासाठी गेली होती. फ्लॅट बघण्याच्या बहाणा करत येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर ती गेली. त्यानंतर एकापाठी एक आपल्या मुलांना खाली फेकले. त्यानंतर स्वत: उडी घेतली.

यामध्ये आमरीन आणि तिच्या आईचा जागीच मृत्यू झाला. तर तौसफ खाली पत्र्याच्या शेडवर पडल्याने तो वाचला आहे. परंतु गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला सुरुवातीला मुंब्रा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र नंतर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement