Buldhana, July 01 (ANI): Twenty-five people died after a bus travelling from Maharashtra’s Yavatmal to Pune caught fire in Buldhana on the Samruddhi Mahamarg Expressway on Saturday. Reportedly at least 25 people, including three children, were killed in the incident. (ANI Photo)
बुलढाणा : समृद्धी महामार्गावर १ जुलै रोजी बुलढाणा येथे झालेल्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना काहीच दिलासा मिळाला नाही. अशी भावना त्यांनी खासदार रामदास तडस यांना भेटून व्यक्त केले. तसेच केंद्राकडे हा प्रश्न मांडावा, अशी विनंती केली. यापार्श्वभूमीवर खासदार तडस यांनी विशेष नियमात लोकसभेत प्रश्न मांडला.
या अपघातात लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाहन चालक व वाहक मालकावर कारवाई व्हावी. एकवीस दिवस लोटले पण काहीच हालचाल नाही. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. ट्रॅव्हल्सचा परवाना रद्द करावा. मदतीची घोषणा पूर्ण करावी, असे तडस म्हणाले.
समृध्दी मार्गावर शंभर किलोमिटर मागे थांबा द्यावा. मोठ्या प्रवासातील वाहनांची सुरक्षा तपासण्यात यावी. अपघाताला आला घालण्यासाठी कठोर कायदे करावे. देशात चांगले ड्रायव्हिंग स्कूल स्थापन करावेत, अशी मागणी खा.तडस यांनी केल्याची माहिती स्विय सचिव विपीन तडस यांनी दिली.