Published On : Mon, Feb 26th, 2024

नागपुरात युवकांना चिरडणाऱ्या ‘त्या’ मर्सिडीज कार चालक महिलेला २४ तासांच्या आत जामीनही झाला मंजूर !

Advertisement

नागपूर : नागपुरातील रामझुला उड्डाणपुलावर मर्सिडीज कारने दोन तरुणांना धडक दिली, त्यानंतर एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातादरम्यान मर्सिडीजमध्ये दोन महिला होत्या. कार चालक महिलेला २४ तासाच्या आता जमीनही मंजूर झाल्याची माहिती आहे.

दुपारी 1.45 च्या सुमारास माधुरी सारडा आणि रितिका मालू नावाच्या दोन महिला रामझुला येथे कार चालवत असताना त्यांनी ॲक्टिव्हाने प्रवास करणाऱ्या दोन तरुणांना धडक दिली, यामध्ये मोहम्मद हुसेन वय 27 वर्ष या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.अतिफ नावाच्या तरुणाचा न्यूरॉन रुग्णालयात मृत्यू झाला. दोन्ही तरुणांना रुग्णालयात नेणाऱ्या लोकांनी दोन्ही महिला दारूच्या नशेत होत्या आणि अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप केला आहे.

Advertisement

नागपूर पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. आता माहितीनुसार मर्सिडीज कार चालविणाऱ्या ‘त्या’ महिलेला २४ तासाच्या आता जमीनही मंजूर झाला.

माहितीनुसार माधुरी शिशिर सारडा (३७, रा. वर्धमान नगर) आणि रितिका उर्फ रितू दिनेश मालू (३९, रा. देशपांडे लेआउट) या मर्सिडीज कारमधून (एमएच/४९/एएस/६११११) जात होत्या.

रविवारी दीडच्या सुमारास मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा (३४, रा. नालसाहब चौक) आणि मोहम्मद अतीक मोहम्मद झिया (३२, रा. जाफर नगर) हे दोघे त्यांच्या ॲक्टिव्हावरून रामझुला ओलांडत असताना भरधाव मर्सिडीजने कारने त्यांना धडक दिली. अपघातानंतर हुसेन आणि अतिक यांना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, रुग्णालयात पोहोचताच हुसेनला मृत घोषित करण्यात आले, तर अतिकची प्रकृती चिंताजनक होती. संध्याकाळी उपचारादरम्यान अतिकनेही अखेरचा श्वास घेतला.आरोपी चालकाविरुद्ध तहसील पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.