नागपूर : शहरातील एक तरुणाला पोटदुखीचा त्रास होत रुग्णालय गाठले. यादरम्यान डॉक्टरांनी त्याला रक्त तपासणी लिहून दिली. चाचणीचे निकाल हाती आल्यानंतर डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही धक्का बसला. त्याची एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह आली. डॉक्टरने रुग्णाचे समुपदेशन सुरू केले. या समुपदेशन सत्रादरम्यानच युवकाने त्याच्या संसर्गास कारणीभूत असलेल्या घटनेसंदर्भात मोठा खुलासा केला.
एचआयव्ही बाधित तरुणाने सांगितले की, तो आपल्या दोन मित्रासह पुण्यात काम करीत होता. ते तिघेही मूळचे नागपुरचे रहीवासी आहेत. काही महिन्यापूर्वी त्यांनी एका देहविक्री करणाऱ्या महिलेला एका रात्रीसाठी पाचारण केले. मात्र या तरुणांना अज्ञात धोक्याची जाणीव झाली नाही,त्यांनी आपली वासना पूर्ण केली. तरुणाने सांगितलेत या घटनेनंतर डॉक्टरांच्या भुवया उंचावल्या.
वेळ वाया न घालवता डॉक्टरांनी घटनेशी संबंधित असलेल्या एकूण सात तरुणांना वैद्यकीय तपासणीसाठी बोलाविले. त्या सर्वांच्या चाचण्या झाल्या आणि प्रत्येकाची एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर वैद्यकीय कर्मचार्यांनी सर्व तरुणांचे समुपदेशन केले. त्यांच्या महिला साथीदारांसह, दोन डझनहून अधिक लोकांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
डॉक्टरांनी सर्व सहभागींचे समुपदेशन करत त्यांची औषधे सुरू केली. तसेच नागपूर महानगरपालिकेला (NMC) यासंदर्भात माहिती देण्यात आली.
ही धक्कादायक घटना संमतीने संभोग करताना संरक्षणाच्या महत्त्वावर जोर देते. तरुणांना त्यांच्या अभ्यासादरम्यान आणि नोकरीदरम्यान मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करून त्यांच्या जीवनाला हानी पोहोचवू शकतील अशा घटनांपासून दूर राहणे गरजेचे आहे.
दरम्यान लैंगिक संक्रमणातून एचआयव्हीचा विषाणू शरीरात जातो, पण त्याचा विंडो पिरियड सुरू होईपर्यत एचआयव्ही आहे, हे समजून येत नाही. पण काही दिवस रूग्णांत फ्ल्यू टाईप तापाची लक्षणे दिसतात. औषधाने तात्पुरता हा ताप कमी होतो. विंडो पिरियडमध्ये रूग्णाला रोज येणारा ताप, जुलाब, वारंवार खोकला, महिनाभरात वजन 10 टक्क्यांनी कमी होणे, हारपिस नागीनसारखे त्वचाविकार, वारंवार तोंड येणे आदी लक्षणे दिसतात, अन् त्यातूनच रक्ताच्या एचआयव्ही तपासणीतून एचआयव्हीचे निदान होते. लवकर निदान आणि औषधोपचार झाल्यास रूग्ण सामान्य जीवन जगू शकतो. त्यामुळे रक्त तपासणीसोबत एचआयव्ही टेस्ट गरजेचे आहे.
– शुभम नागदेवे