मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. आरक्षणासाठी मराठा समाजातील बांधव ठिकठिकाणी आंदोलन करीत आहे. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांना उपोषण करीत आहेत. या सर्व घडामोडी सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला.
मराठा आरक्षणाविषयी बोलण्याआधी तिन्ही नेत्यांच्या संभाषणाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आपण बोलून मोकळं व्हायचं असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावरून सत्ताधारी मराठा आरक्षाविषयी गंभीर नाही हेच दिसून येत आहे.
एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांचे संभाषण –
एकनाथ शिंदे – “आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.
अजित पवार – “हो……येस’
देवेंद्र फडणवीस – “माईक चालू आहे.
दरम्यान मराठा आरक्षणाबाबत जी चर्चा झाली त्यानंतर पत्रकार परिषदेत भूमिका मांडण्याआधी हा संवाद झाला. यावरून विरोधकांनी तिन्ही नेत्यांना धारेवर धरले आहे.