Published On : Sat, Mar 16th, 2024
By Nagpur Today Nagpur News

ते तर… ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ – चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

शिवसेना आमदार ठाकरेंकडे जाणार नाहीत

महायुतीमध्ये असणारे शिवसेनेचे आमदार परत उद्धव ठाकरेंकडे जाणार नाहीत. विशेष म्हणजे, असा विचार करणेही ” मुंगेरीलाल के हसीन सपने ” म्हटले पाहिजे, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

नागपूर येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते. श्री बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे व त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांना आजही दिवास्वप्न पडते, याचेच आश्चर्य आहे मुख्यमंत्री एकनाथ शिदे उत्कृष्ठपणे सरकार चालवत आहेत. एवढ्या चांगल्या सरकारमधील आमदारांना परत जाण्याची शक्यता नाहीच.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजपाने २० जागा जाहीर केल्या आहेत. उमेदवारांचा प्रचाराबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. ५१ टक्के मते कशी मिळतील यासाठी नियोजन करणार आहोत. ज्या जागांवर एकमत झाले आहे, त्या जागा घोषित करण्याची सहकारी पक्षांना मुभा आहे. महायुतीचे तिन्ही नेते एकत्र येतील व लवकरच उर्वरित जागांवर एकमत होईल. भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जागा भाजपाच्याच आहेत त्यावर भाजप-महायुती एकत्र लढणार, असेही ते म्हणाले.

ते असेही म्हणाले…

• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताचा संकल्पाला साथ देण्यासाठी येणाऱ्यांचे स्वागत आहे. राज ठाकरे जर येत असतील, तर त्यात वावगे काहीच नाही.

• उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राजू पारवे त्यांना डीपीडीसी अंतर्गत असलेल्या प्रस्तावांच्या संदर्भात भेटले. पारवे यांनी मलाही फोन केला होता.

• प्रकाश आंबेडकर हे आमच्या विचारांशी सहमत नाहीत, राजकारणात कुणी परमेंनट शत्रू अथवा मित्र नाही

• स्थानिक राजकारणामध्ये काही मतभेद असतात विजय शिवतारे व अजित पवार यांच्यातील वाद व मतभेट मिटतील.

• भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा 16 तारखेला सायंकाळी नागपूरला येणार आहेत.

Advertisement