लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर आणि आशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा राहणार बाधित…
शटडाऊन दरम्यान व नंतर बाधित भागांत टँकर पुरवठा ही बंद राहणार
२६ जून (शनिवारी) ला कमी दाबाचा पाणीपुरवठा…
नागपूर, २३ जून, २०२१ : जून २४ ला सर्वत्र साजरा केल्या जाणार्या वट सावित्री ह्या सनानिमित्य नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी कन्हान जलशुद्धीकरण केंद्र वरून शहराकडे येणाऱ्या १३०० आणि ९०० मीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील उद्भवलेल्या चार (४) गळत्याची दुरुस्ती तसेच कन्हान जलशुद्धीकरण केंद्र येथे देखभाल आणि दुरुस्ती चे महत्वाची कामे करण्यासाठी घेतलेले 30 तासांचे शटडाऊन आता एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे.
नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी हे ३० तासांचे शटडाऊन आता, २५ जून (शुक्रवार) सकाळी १० ते २६ जून २०२१ (शनिवार)) दुपारी 2 दरम्यान घेण्याचे ठरविले आहे.
या दरम्यान या कामांमुळे लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा २५ जून (शुक्रवारी ) ला संपूर्णपणे बाधित राहणार आहे. तसेच शटडाऊन संपल्यावर २६ जून ला कमी दाबाचा पाणी पुरवठा होणार आहे. शटडाऊन कालावधी दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
या शटडाऊन काळात खालील कामे प्रस्तावित आहेत:
कन्हान-१३०० मुख्य जलवाहिनी: उप्पालवाडी बसथांब्याजवळ असलेले गळती दुरुस्ती
कन्हान -९०० मुख्य जलवाहिनी : कामठी ( GRC) जवळ गळती दुरुस्ती, वारेगाव (नवीन रस्ता) जवळ गळती दुरुस्ती, पिवळी नदी च्या मागे जलवाहिनीवर गळती दुरुस्ती.
कन्हान जलशुद्धीकरण केंद्र: CC Tank चे देखभाल, दुरस्ती आणि गळती दुरुस्ती
या कामामुळे खालील जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहील:
आशी नगर झोन: बेझनबाग जलकुंभ, बिनाकी एग्झीस्टिंग, बिनाकी १ व २, इंदोरा १ व २, गमदूर डायरेक्ट टॅपिंग, आकाशवाणी डायरेक्ट टॅपिंग, जसवंत टॉकीज डायरेक्ट टॅपिंग
सतरंजीपुरा झोन: बस्तरवारी १, २अ व २ब, शांती नगर जलकुंभ, वांजरी (विनोबा भावे नगर), इटाभट्टी डायरेक्ट टॅपिंग
नेहरू नगर झोन: नंदनवन (जुने) जलकुंभ, नंदनवन १ व २, सक्करदरा १, २ व ३, ताजबाग व खरबी जलकुंभ
लकडगंज झोन: भांडेवाडी, देशपांडे लेआऊट (भरतवाडा), लकडगंज, मिनिमाता नगर, सुभान नगर, कळमना, व पारडी १ व २ जलकुंभ
यादरम्यान जवळपास लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे., त्यामुळे टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने, नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे.