कन्हान : धरम नगर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक केलेला आरोपी कन्हान पोलीस कोठडीतून पळुन गेलेल्या ची घटना गुरुवारी रात्री ७ वाजता दरम्यान घडली. या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली असून जोमाने शोध मोहीम सुरू असून सुद्धा आरोपी शोधण्यात अद्याप पोलीसांना यश आले नाही.
पिपरी – कन्हान येथील आरोपी विष्णु ऊर्फ बालु नामदेव दुधबावने वय २६ वर्ष या युवकाने धरम नगर येथीलच १७ वर्षीय अल्पवयीन फिर्यादी मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारिरसंबध प्रस्थापित केले . मंगळवार दि.२६ सप्टेंबर २०१७ चे रात्रीचे ८ वाजता पासुन ते रविवार दि.१ ऑक्टो. २०१७ पर्यत शोषण करून लग्नास नकार देऊन, तिला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देऊन शारिरीक छळ केल्याची धरम नगर पिपरी -कन्हान येथील. फिर्यादी मुलीच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी आरोपी विरूध्द भादंवि ३७६ (२) (जे) (एन), ५०६ सहकलम ४, ५ (एल), ६ अन्वये गुन्हा नोंदवुन त्याला २ ऑक्टोबंर ला अटक केली.
न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. या प्रकरणाच्या तपासाठी पोलीस उपनिरीक्षक देवानंद लोणारे, हरिश्चंद्र बमनोटे, व मडावी हे आरोपी विष्णु ला गुरूवार ( दि ५)ला कुवारा भिवसेन येथे घेऊन गेले होते. सायंकाळी त्यांच्या पिपरी येथील घरी गल्ली तुन पायदळ नेत असताना त्याने हाताला जोराचा झटका मारून दोरखंड सह पळुन गेला. पोलीसांनी त्याता कन्हान नदी पर्यत पाठलाग केला परंतु तो पोलीसाच्या हातावर तुरा देऊन पळुन गेला.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी कन्हान पोलीस स्टेशन ला भेट देऊन त्यांच्या विरोधात भादंवि २२४ अन्वये गुन्हा दाखल करून शोध मोहीम राबवुन रात्री व दिवसभर शोध घेतला तरी शुध्दा बातमी लिहेपर्यंत पोलीसांना आरोपी पकडण्यास यश आले नव्हते.
आरोपी विष्णु झुधबावने यांनी मार्च २०१६ मघ्ये सुद्धा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी कन्हान पोलीस स्टेशन मघ्ये गुन्हा नोंदविला होता.