नागपूर :पुण्यात भरधाव पोर्श कारखाली येत दोन तरुणांचा जीव गेला. अल्पवयीन चालक परवाना नसतानाही ही कार चालवत होता. याप्ररकरणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबत एक्सवरून पोस्ट करत या घटनेचा निषेध केला.
अनिश अवाधिया आणि अश्विनी कोस्टा यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. आरोपी वेदांत अग्रवालला कठोर शिक्षा झाली पाहिजे. बालन्याय मंडळाचा निषेध,अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी कोणालाही सोडणार अथवा पाठिशी घालण्यात येणार नसल्याचे सांगितले. तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई करू असेही स्पष्ट केले. त्यानंतरही जनतेत रोष कायम असून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.