नागपूर : हुडकेश्वर पोलीस स्टेशनअंतर्गत बेसा परिसरात एका लहान मुलीला बंधक बनवून सिगारेटच चटके देत तिचा अमानुषछळ करणाऱ्या आरोपीला नागपूर विमानतळावरच पोलिसांनी फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दाम्पत्यासह तिघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी दाम्पत्यानी १० वर्षाच्या मुलीला पंजाब-हरियाणा येथून घरकाम करण्यासाठी आणले होते. तिने कामात काही चूक केली तर तिला सिगारेटचे चटके देत तिला मारहाण करायचे. आरोपी पीडितेवर शारीरिक अत्याचारही करत होता. हा संपूर्ण प्रकार स्थानिक नागरिकांनी उघड केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.काल आरोपी विमानाने नागपुरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक विक्रांत सगणे यांच्यासह पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली.
पाच दिवसांपूर्वी मुलीला घरात कोंडून दाम्पत्य बंगळुरूला निघून गेले. बुधवारी मुलीने खिडकीतून आवाज दिल्यामुळे ही घटना उघडकीस आली. मुलीला हुडकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले . दाम्पत्य सदनिकेला कुलूप लावून बंगळुरूला निघून गेले. त्यांनी घरातील बाथरूममध्ये त्या मुलीला कोंडून ठेवले होते. तिला खायला काही ब्रेडचे पाकीट ठेवले होते. सदनिकेचे वीज बिल न भरल्यामुळे बुधवारी काही कर्मचारी वीज कनेक्शन कापायला आले. त्यांना खिडकीतून चिमुकली हात बाहेर काढून मदत मागत असल्याचे दिसले. त्यानंतर मुलीने तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती पोलिसांना दिली.