नागपूर: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर याचा व्हिडीओ तिच्या वडिलांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणातील २० वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली.प्रज्योत हरिहर बावनडोळे असे आरोपीचे नाव असून तो नागपूरच्या शांतीनगर परिसरात राहतो. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी हे दोघेही एकमेकांना ओळखत होते.
दरम्यान आरोपी मुलाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिचा व्हिडिओ बनवला. यानंतर तो मुलीच्या वडिलांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवण्यात आला. हा मुलगा सध्या बी.कॉम.मध्ये शिकत आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रज्योतला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली. त्याच्याविरुद्ध आयपीसी आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.