नागपूर : राज्याच्या उपराजधानीत गणरायाच्या आगमनाची आतुरता वाढतच चालली आहे. सर्व भक्त गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहेत.
नागपुरात ठिकठिकाणी गणपती बाप्पाचा आगमन सोहळ्याला आजपासूनच सुरुवात झाली आहे. येत्या ७ सप्टेंबरला जरी विघ्नहर्ताचे आगमन होत असेल तरी गर्दीच्या आणि सोयीच्या अनुषंगाने आजपासूनच नागपूरकरांनी बाप्पाला घरी आणि पंडाल मध्ये विस्थापित करण्यास सुरुवात केली.
मात्र गणेश मूर्तीची पूजाअर्चना भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीलाच करण्यात येईल. नागपुरात ठिकठिकाणी घरगुती गणपतीपासून तर मानाच्या गणपती बाप्पांचे ढोल ताशांचा गजरात स्वागत करण्यात येत आहे.घरोघरी आणि सार्वजनिक मंडळामध्ये १० दिवस हा उत्सव मोठ्या जल्लोषात सुरू राहतो.