मुंबई : देशात नुकताच १८ व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे.राज्यातील लोकसभा मतदारसंघात निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा निकालावरराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
महाराष्ट्रात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. देशपातळीवरचं चित्रही आशादायक आहे.
आज अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मर्यादित १० जागा लढवल्या पण आम्ही जवळपास ८ जागांवर आघाडीवर आहोत. म्हणजे आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे,असे पवार म्हणाले.
इंडिया आघाडीने हिंदी भाषिक प्रदेशात विशेष लक्ष दिले , त्यामुळे आज उत्तरेकडचा निकाल बदलला आहे, असे मतही पवार यांनी स्पष्ट केले.