Published On : Mon, Mar 24th, 2025
By Nagpur Today Nagpur News

राज्य शासनाचे सर्वोत्तम काम हीच मोठी आश्वासक बाब : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पायाभूत सुविधा विकासासाठी बँकाकडून सर्वोत्तम सहकार्य
Advertisement

मुंबई : महाराष्ट्र प्रगतीशिल राज्य असून राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व बँकाचे सहकार्य नेहमीच मिळत आले आहे.राज्यातील रस्त्यांची गरज लक्षात घेवून रस्ते विकासासाठी नियोजन करण्यावर भर देण्यात येत आहे.समृध्दी महामार्गाच्या यशस्वी कामामुळे आज अनेक बँका राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना कर्ज देण्यासाठी पुढे येत आहेत.राज्य शासनाचे सर्वोत्तम काम हीच सर्वात मोठी आश्वासक बाब आहे.महाराष्ट्र शासन म्हणजेच बँकासाठी आश्वासक असून बँकाकडून राज्य शासनाला यापुढे असेच सर्वोत्तम सहकार्य मिळेल अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

विधानभवन येथे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता,मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर,प्रधानसचिव अश्विनी भिडे, सचिव रस्ते सदाशिव साळुंखे,महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पदावर ब्रिजेश दीक्षित, हुडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय कुलक्षेत्र, आय. आय. एफ. सी. एल. (इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड) चे मुख्य प्रबंधक राजकुमार राल्हण,कॅनरा बँकेचे महाप्रबंधक अलोक कुमार अग्र वाल, पंजाब नॅशनल बँकेचे जनरल मॅनेजर एस राजगुरू, नको बँकेचे कार्यकारी संचालक नितीन बोडके, बँक ऑफ महाराष्ट्राचे जनरल मॅनेजर अमित कुमार शर्मा, नाफेड चे उपाध्यक्ष हर्षल महावरकर, पंजाब अँड सिंध बँकेचे मुख्य महाप्रबंधक विनोद कुमार पांडे, एस. बी. आय. कॅपिटल लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष असित रंजन सिकंदर विविध बँकाचे अधिकारी उपस्थित होते.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत सर्व बँकाच्या सहकार्याने राज्यात २५ कोटी ८७५ कोटींचे अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे अत्यंत चांगली बाब आहे.राज्यातील पायाभूत सुविधांसाठी या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्यात १ लाख कोटी रूपयांची कामे पूर्ण होतील हे सांगताना मला आनंद होत आहे.रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करूनच राज्य विविध बँकाकडून नियमित कर्ज घेवून त्याची परतफेड करत असते. राज्यातील रस्ते चांगल्या दर्जाचे होण्यासाठी राज्य शासन कोणाच्याही शिफारशीशिवाय प्रत्यक्ष रस्त्यांची गरज कोणत्या भागात आहे हे लक्षात घेवून रस्ते विकासासाठी नियोजन करून उत्तम दर्जाचे रस्ते देण्यासाठी प्रयत्नशील आहे.सर्व बँकानी राज्यातील पायाभूत सुविधांसाठी राज्य शासन करत असलेले नियोजन व अंमलबजावणी याची माहिती जरूर घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

राज्यातील पायाभूत सुविधा बळकटीकरणावर भर : शिवेंद्रराजे भोसले
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले,महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. सुधारित हॅम पहिल्या टप्प्यातील कामे प्रगतीपथावर आहेत.माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एमएसआयडीसी मार्फत ३४ जिल्ह्यात जवळजवळ ५९७० किमी लांबीचे रस्ते सुरू करण्याचे प्रस्तावित होते ते सर्व कामे झाली आहेत उद्यीष्टापेक्षा जास्त कामे सुरू केली असून केले असून ते लवकर पूर्ण करण्यात येतील असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले की.शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पुणे ते शिरूर उडाणपूल काम,तळेगाव- चाकण -शिक्रापूर हायवे,हडपसर यवत हायवे या कामांना आवश्यक असलेली मंत्रीमडळाची मान्यता घेवून नॅशनल हायवेची कामे गतीने पूर्ण करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. ***

Advertisement
Advertisement