Published On : Mon, Jun 10th, 2019

दहावीत नापास झाल्याच्या संतापातून विद्यार्थीनो घरून बेपत्ता

Advertisement

कामठी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहाव्या वर्गाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यावर्षीचा कामठी तालुक्याचा दहाव्या वर्गाचा निकाल मागच्या वर्षीच्या तुलनेत 17 टक्क्यांनी कमी लागला यानुसार येथील नूतन सरस्वती विद्यालय मध्ये शिकत असलेली दहाव्या वर्गातील विद्यार्थिनी ही जाहीर निकालात दहावीच्या पूर्ण विषयात नापास झाल्याने हिला एकच धक्का बसल्याने संतापून गेली होती .वडील भंगार व्यवसाय करीत असून आई घरकाम करते , आई वडिलांचा विश्वास व जोमाने केलेला अभ्यासाचे फलश्रुती पूर्ण विषयात नापास झाल्याचे कळाल्याने आई वडिलांशी नजर मिळवीत नव्हती तर आज सकाळी 11 वाजता जयस्तंभ चौक स्थित एका खाजगी शिकवणी वर्गात ट्युशन क्लासेस ला जाण्याचे सांगून घराबाहेर पडली मात्र इतका वेळ होऊनही मूलगी घरी न परातल्याने घरात चिंतेचे वातावरण पसरले , सर्वत्र शोध घेऊनही कुठेही थांगपत्ता लागलेला नाही तसेच शिकवणी वर्गाकडे विचारणा केली असता ही विद्यार्थिनी क्लासेस ला आलीच नसल्याचे कळल्याने घरमंडळीची अजूनच चिंता वाढली .यासंदर्भात फिर्यादी गणेश गेडाम यांनी स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या माहितीवरून मिसिंग ची तक्रार नोंदविण्यात आली.घरून बेपत्ता झालेल्या या विद्यार्थिनींचे नाव शिवाणी गणेश गेडाम वय 15 वर्षे रा जयभीम चौक कामठी असे आहे.

– संदीप कांबळे कामठी

Gold Rate
22 April 2025
Gold 24 KT 99,400 /-
Gold 22 KT 92,400 /-
Silver / Kg 97,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement