पाटणसावंगी येथे भव्य रक्तदान शिबीर
.
देशाच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी व सहकारमहर्षी बाबासाहेब केदार यांच्या जयंतीच्या निमित्याने श्री गणेश प्रासादिक शिक्षण संस्था संचालित आदर्श हायस्कूल व स्व. आनंदराव केदार पाटील कनिष्ठ महाविद्यालय पाटणसावंगी द्वारा आदर्श हायस्कूल येथे भव्य रक्तदान शिबिर व कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १२७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सदर शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले. या वेळी संस्थेच्या पदाधीकर्यांनी मंत्री सुनील केदार यांचे स्वागत केले. यावेळी आपल्या वक्तव्यात मंत्री सुनील केदार यांनी समस्त रक्तदात्यांचे आभार मानले व रक्तदाता हा सर्वात मोठा दानविर असल्याचे कथन केले.
=
या वेळी प्रमुख रूपाने जि.प.उपाध्यक्ष श्री मनोहरभाऊ कुंभारे,श्री गजाननरावजी बंड,सौ,संध्याताई ठाकरे,कु.सुहासताई केदार सचिव गणेश प्रासादिक शिक्षण संस्था,पाटणसावँगी सहसचिव श्री सुधीर केदार,सौ.मुक्ता कोकड्डे जी.प.सदस्या,श्री रमेश हाडके प.स.सदस्य,श्री अजय केदार सरपंच पाटणसावँगी,गणेश प्रासादिक शिक्षण संस्था संचालक श्री जाणरावजी केदार,श्री अनिल राय,श्री मधुकर निमजे,ना.जी.ग्रा.यु.काँ.अध्यक्ष राहुल सीरिया,श्री दीलीप केदार,श्री ईश्वर झोड,श्री आनंदराव साबळे,श्री रविंद्र पकीड्डे,श्रीदेवा मिलमिले,सर्व मुख्याधापक,शिक्षक,इतर कर्मचारी व पाटणसावँगी ग्रामस्थ उपस्थित होते.