Published On : Sat, Aug 19th, 2023
By Nagpur Today Nagpur News

कन्हान नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले तर दोघांचा शोध अद्यापही सुरूच

Advertisement

नागपूर : वाकी परिसरातील कन्हान नदीजवळ फिरायला गेलेल्या चार मित्राचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुडालेल्या चौघांपैकी दोघांचे मृतदेह शोधण्यात शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलिसांना यश आले. इतर दोघांच्या मृतदेहांचा शोध सुरू आहे. शुक्रवारी रात्री अंधार पडल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. शनिवारी (आज) सकाळी पुन्हा शोधकार्याला सुरवात झाली आहे.

सोनिया मरसकोल्हे (१७) नारा आणि विजय ठाकरे (१९) नारा या दोघांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू केली होती. यासाठी विविध यंत्रणांचीही मदत घेतली गेली. शेवटी रात्री दोन मृतदेह शोधण्यात चमूला यश आले.

Gold Rate
11 April 2025
Gold 24 KT 93,800/-
Gold 22 KT 87,200/-
Silver / Kg - 93,100/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नारा आणि कामठी येथील सहा मित्र-मैत्रिणी १७ ऑगस्टला सकाळी ११ वाजता कामठीतून वाकी दर्शनासाठी गेले. दर्शनानंतर कन्हान नदीवर आंघोळीचा मोह मित्र-मैत्रिणींना आवरला नाही.
त्यापैकी दोघी काठावर आंघोळ करीत होत्या. यादरम्यान नदीत उतरलेली सोनिया बुडायला लागली. तिला वाचवण्यासाठी विजय ठाकरे, अंकुल आणि अर्पितनेही पाण्यात उडी घेतली. शेवटी चौघेही नदीत बुडाल्याची माहिती आहे.

Advertisement
Advertisement