कामठी ता 20:;’ समाज का नारा जयभिम बाबू हरदास की खोज” हा हिंदी भाषीय ग्रंथ आता राज्य सरकार मराठी भाषे मध्ये प्रकाशित करणार आहे. ग्रंथाचे लेखक किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी चंद्रपूर येथे जाऊन बाबू हरदास एल एन यांचे निकट सहयोगी देवाची खोब्रागडे यांच्या परिवाराची भेट घेऊन ही माहिती दिली. देवाजी खोबरागडे हे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे वडील होते.
स्वतंत्र मजूर पक्षाच्या तिकीट वर 1937 ला मध्य प्रांत असेंबली साठी नागपूर मधून बाबू हरदास एल .एन. व चंद्रपूर मधून देवाजी खोब्रागडे हे निवडून आले होते. लोकप्रिय बाबू हरदास एल. एन. यांचं संपूर्ण जीवन चरित्र राज्य सरकार मराठी भाषेत प्रकाशित करणार आहे. मराठी भाषेत अनुवाद केलेलं लोकप्रिय बाबू हरदास एल. एन . यांचे जीवन चरित्र पाठवा असा पत्रव्यवहार माझ्याशी शासनाने केला परंतु माझ्याकडूनच उशीर झाल्याची खंत ग्रंथाचे लेखक किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी व्यक्त केली.
“समाज क्रांती का नारा जयभीम बाबू हरदास की खोज” या ग्रंथात चे अनुवाद झाले असून प्रूफ रीडिंग ला दिले आहे व प्रेस मध्ये प्रिंटिंग चे काम शेवटच्या टप्प्यावर आहे अशी माहितीही किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी दिली.
देवाजी खोबरागडे यांना चार मुले होती, त्यापैकी बॅरिस्टर भाऊराव खोबरागडे उर्फ राजाभाऊ, श्रीहरी खोबरागडे, श्याम खोब्रागडे गिरीश खोब्रागडे, व हेमचंद्र खोबरागडे यांच्या मुलगा प्रवीण खोब्रागडे व प्रवीण खोब्रागडे यांचा मुलगा राजस खोब्रागडे यांच्याशी किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. याप्रसंगी बाबू हरदास एल एन यांचे सहकारी देवाजी खोबरागडे यांच्या वेळेसचे ऐतिहासिक दस्तावेज खोब्रागडे परिवारांनी किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांना दिले.