नागपूर : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला अर्थसंकल्प आज 10 मार्चला सादर करण्यात येणार आहे.दुपारी दोन वाजता मांडला जाणार असून महायुती सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प असेल. तर वित्तमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा 11 वा अर्थसंकल्प असेल.
अजित पवार मांडणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सध्या राज्याचे लक्ष लागले असून लाडक्या बहिणी देखील आस लावून बसल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 2100 रुपये अजित पवार करणार का? महायुती आपलं आश्वासन पाळणार का? हे पहावे लागेल.
नवीन कोणत्या घोषणा होणार?
शेतकऱ्यांचे शेती कर्ज माफ होणार का? यासह शिक्षण, आरोग्य, महसूल, कामगार, महिला व बालविकास, कायदा आणि सुव्यवस्था आदींसाठी कोणती मोठी घोषणा होणार का? नवीन कोणत्या योजना जाहीर होणार का? राज्याच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार? कृषी, आरोग्य, शिक्षण, महसूल, सामान्य प्रशासन आदी क्षेत्रासाठी नवीन कोणत्या घोषणा होणार आहेत? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.