Published On : Fri, Dec 29th, 2023
By Nagpur Today Nagpur News

केंद्र सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना मोठे गिफ्ट देण्याच्या तयारीत !

पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार मोठी कपात
Advertisement

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपातीसांदर्भात चर्चा सुरु आहे. सर्व काही बरोबर झाले तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 6 रुपये ते 10 रुपये कपात होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही महिन्यांपासून क्रूड आईलच्या दरात घसरण झाली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आईलचे दर 80 डॉलर प्रती बॅरल आहे. यामुळे भारतीय तेल कंपन्यांना फायदा झाला आहे. आता हा फायदा सर्वसामान्य लोकांना देण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे.

तत्पूर्वी 22 मे रोजी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली होती.त्यानुसार केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात बदल करत पेट्रोलचे दर 13 रुपये तर डिझेलच्या दरात 16 रुपये कपात केली होती.तसेच दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन शिवसेना-भाजपचे सरकार आले होते.

Today’s Rate
Friday 27 Sept. 2024
Gold 24 KT 75,900/-
Gold 22 KT 70,600 /-
Silver / Kg 92,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पेट्रोल, डिझेलवर लावण्यात येणाऱ्या व्हॅटच्या दरात कपात केली होती. व्हॅटमध्ये कपात करण्यात आल्याने त्यावेळी राज्यात पेट्रोल प्रती लिटर पाच रुपये तर डिझेल प्रती लिटर तीन रुपयांनी स्वस्त झाले होते.

Advertisement