कन्हान : – कांद्री महामार्गावरील सर्व्हिस रोडवर उभ्या कोळशा दहाचाकी ट्रकने मागे घेऊन ऑटो ला धडक मारल्याने टेकाडीच्या आंगणवाडी सेविका प्रतिभा मोहुर्ले चा घटनास्थळीच मुत्यु झाला.
शनिवार (दि.२४) ला १०.३० वाजता दरम्यान टेकाडी येथुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे गोवर रूबेला च्या मिटिंग करिता आंगणवाडी सेविका सौ प्रतिभा रामकृष्णाजी मोहुर्ले वय ५० वर्ष रा टेकाडी ह्या ऑटो क्र. एम एच ३१ सी एम ९२१८ ने कन्हान ला येताना नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ वरील जय दुर्गा मंगलकार्यालय कांद्री येथे ऑटोचे चालु पेट्रोल संपल्याने ऑटो चालकाने आपला ऑटो बाजुला सर्व्हिस रोडवर उभा करून पेट्रोल रिझर्व्ह लावत असताना मागेच उभ्या कोळशा दहाचाकी ट्रक क्र. एम एच ४० बी जी ९९२१ च्या चालकाने मागे पुढे न पाहता एकाएकी निस्काळर्जीने ट्रक मागे घेऊन उभ्या ऑटो ला जोरदार धडक मारल्याने ऑटो समोर जावुन अंगणवाडी सेविका रोडवर पडुन ट्रकचे मागचे चाक पायावर जावुन पाय चेंदामेंदा होऊन व डोक्याला जबर मार लागुन मोठय़ा प्रमाणात रक्त स्त्राव झाला व घटनास्थळीच तिचा मुत्यु झाला .
महिलेला जवळच जे एन दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले .घटनास्थळी पोलीसांनी पोहचुन महिलेचा मृतदेह कामठी उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदना करिता पाठविला . ट्रक व ऑटो ला ताब्यात घेतले असुन ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला . कन्हान पोलीस स्टेशन चे बीट जमादार नरेश वरखडे , पो कॉ रंजित बैसारे पुढील तपास करीत आहे .
नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील कन्हान शहरातील राय नगर, पेट्रोल पम्प, नाका नं.७ , कांद्री , पेट्रोल पम्प कांद्री, जे एन दवाखाना , टेकाडी फाटा, बस थांबा पुढे सामोर महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर उभ्या ट्रकच्या रांगा असल्याने अपघाताचे प्रमाणात वाढ झाली असुन या सर्व्हिस रोड पार्किंगची पहिली बळी ही प्रतिभा मोहुर्ले ठरली आहे . एका महिन्या अगोदर २२ ऑक्टोबर ला तारसा रोड रेल्वे फाटकाजवळ निलजच्या आंगणवाडी सेविका इंदुबाई वामनजी पाहुणे चा सुध्दा कोळशा ट्रकच्या मोटार सायकल ला धडकेत महिला रोडवर पडुन पायावरून चाक गेल्याने मोठय़ा प्रमाणात रक्त स्त्राव झाल्याने आंगणवाडी सेविकाचा मुत्यु झाला होता .
कोळशा ट्रक अपघातात एक महिना होतो तोच दुसरी आंगणवाडी सेविकाचा सर्व्हिस रोडवर उभ्या ट्रकच्या चालकाने एकाएकी निष्काळजी ट्रक मागे घेण्यात ऑटोला घडक मारून निष्पाप दुसऱ्या आंगणवाडी सेविकाचा बळी घेतल्याने संतप्त जमावाने महिलेचा मुत्युदेह कन्हान पोलीस स्टेशनला थाबंवुन महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर उभ्या ट्रकवर कार्यवाही करून सर्व्हिस रोड पार्किंग झोन बनण्यापासुन तसेच अपघाताचे कारण बनण्यापासुन वाचविण्यात यावे . अशी परिसरातील संतप्त नागरिकांनी मागणी केली आहे .