रामटेक : श्री नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक येथे वार्षिक स्नेहसंमलन व सुवर्ण महोत्सव सप्ताह कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला। विद्यार्थ्यांनी सांकृतिक कार्यक्रमात आपल्या कलेचा उत्कृष्ट परिचय दिला। कार्यक्रमाचे उदघाटन रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार ऍड. आशिष जयस्वाल यांचे हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षा कॉलेज च्या प्रिन्सिपल डॉ. संगीता टक्कामोरे ह्या होत्या। विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स & सिंगिंग स्पर्धा मध्ये उत्कृष्ट सादरीकरण केले व उपस्थितांची मने जिंकली. :नरेंद्र तिडके महाविद्यालयाने अनेकांचे आयुष्य घडविले आहे.
महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा निश्चितच लाभ होईल.विद्यार्थ्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवायला हवे की सीमेवर लढणे म्हणजेच देशभक्ती नव्हे तर गावाची परिसराची स्वच्छता करणे ही सुद्धा एक प्रकारची देशभक्तीची आहे.असे प्रतिपादन आमदार अॅड. आशिष जयस्वाल यांनी केले ते रामटेक येथील नरेंद्र तिडके कला व वाणिज्य विद्यालयाच्या सांस्कृतिक व बौद्धिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संगीता टक्कामोरे या होत्या.याप्रसंगी समाजसेवक कमलेश शरणागत हे उपस्थित होते.
सर्वप्रथम शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.आपल्या उद्घाटनपर भाषणात आमदार अॅड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले की नरेंद्र तिडके महाविद्यालयाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल तसेच या महाविद्यालयाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू असेही सांगितले.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. संगीता टक्कामोरे यांनी विद्यार्थ्यांनी आयुष्यातील ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करावे असे आवाहन केले.याप्रसंगी महाविद्यालयाच्या अहवालाचे वाचन कु. पूनम रामटेक हिने केले.कार्यक्रमाचे संचालन डॉ.मनोज तेलरांधे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. महेंद्र लोधी यांनी केले.