भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कर्नाटकातील काँग्रेस सरकारला इशारा
बागलकोट चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तातडीनं स्थापित करा
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्टिटवरुन काय म्हटलंय पाहुयात
कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं मुजोरी करत बागलकोट चौकातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्री हटवला आहे. हा संपूर्ण हिंदुस्थान आणि कोट्यवधी शिवभक्तांचा अपमान आहे. कर्नाटकातील काँग्रेसची ही मुजोरी आम्ही सहन करणार नाही.
महापुरुषांचा सातत्यानं अपमान करणं हे काँग्रेसचं धोरण झालं आहे. कर्नाटक सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानानं स्थापित करावा अन्यथा काँग्रेसला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.