मुंबई: दहीहंडी उत्सवामध्ये जखमी झालेल्या गोविंदावर येथील केईएम रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज भेट देऊन जखमी गोविंदांची विचारपूस केली.
काल झालेल्या दहीहंडी उत्सवात मुंबईमध्ये विविध ठिकाणी अनेक गोविंदा जखमी झाले आहेत. यापैकी काही गोविंदांना उपचारर्थ के.ई.एम. रुग्णालयात दाखल करुन रात्री उशिरा घरी सोडण्यात आले, परंतु काही गोविंदा अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आज सकाळी क्रीडामंत्री श्री. तावडे यांनी या जखमी गोविंदाची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. जखमी गोविंदांवर सुरु असलेल्या उपचाराची माहिती डॉक्टरांकडून घेतली तसेच त्यांच्यावर योग्य उपचार करण्याबाबतच्या सूचनाही दिल्या. यावेळी आमदार आशिष शेलार उपस्थित होते.