नागपूर: पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका परिसरातून सहा वर्षे वयोगटातील दोन मुले आणि एक मुलगी बेपत्ता झाली. पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपींवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणात आता धक्कायक माहिती समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या तिन्ही मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.तौफिक फिरोज खान ,आलिया फिरोज खान,आफरीन ईरशाद खान अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
माहितीनुसार, ही मुले कारच्या आत खेळत होती आणि चुकून त्यांनी स्वतःला आतून बंद केले, त्यामुळे गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला. यावेळी पोलिसांनी कोणताही गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारली आहे. तथापि, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (जीएमसीएच) पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरु आहे.
दरम्यान मृत्यू झालेल्या मुलांमध्ये दोन भावंडे तर एक त्यांची मैत्रिण आहे. शनिवारी सायंकाळी सहा वर्षे वयोगटातील तीनही मुले टेका नाकाजवळील फारुख मैदानावर खेळत होते. रात्र झाली घरी न परतल्याने पालकांनी पालकांनी पोलिसांत तक्रार केली होती.