Advertisement
नागपूर : अमरावती रोडवरील धामणा परिसरातील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट होऊन ६ निरपराध कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. इतर सहा ते सात कामगार गंभीर झाले असून त्यांच्यावर दंदे रुग्णालयात उपचार सुरु आहे.
दगावलेल्यांमध्ये प्रांजली मोदरे (२२, धामणा), प्राची फलके (२०), वैशाली क्षीरसागर (२०), शीतल चटप (३०) मोनाली अलोने (२७) आणि पन्नालाल बंदेवार (५०, सातनवरी) यांचा समावेश आहे. मात्र काल आणि आज जखमींपैकी शुक्रवारी दानसा मरसकोल्हे (२६, मध्य प्रदेश), श्रद्धा पाटील (वय २२ )यांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ८ झाली आहे.
दरम्यान चामुंडी या दारूगोळा कंपनीत या कंपनीत फटाक्याच्या वाती तयार केल्या जातात. येथे गुरुवारी जवळपास शंभरावर मजूर कामाला होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक स्फोट झाल्याने परिसरात खळबळ उडाली.