Advertisement
नागपूर : दक्षिण-पश्चिम विधानसभेतून देवेंद्र फडणवीस सलग सहाव्यांदा विजयी होताना दिसत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देवेंद्र फडणवीस त्यांचे विरोधी उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यापेक्षा 27386 मतांनी आघाडीवर आहेत.
फडणवीस यांचा विजय निश्चित मानला जात असून भाजप कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष सुरू केला आहे. भाजपचे कार्यकर्ते बॅनर आणि पोस्टर लावून आनंद साजरा करत आहेत. त्यामुळे फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.