लॉकडाऊन च्या दीर्घ काळाने मजूर-मध्यमवर्गीय संकटग्रस्त-विलास वाटकर,जिल्हाध्यक्ष
वाडी: वंचीत-बहुजन आघाडी चे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात लॉकडाऊन च्या नियमाचा हवाला देऊन महाराष्ट्र सरकारने अनेक व्यवसाय व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही सुरू न केल्याने या गंभीर समस्या कडे लक्ष वेधण्यासाठी डफली वाजवा आंदोलन व सविनय कायदाभंग चा शासनाला इशारा दिला होता. त्या नियोजना नुसार वाडीतही वंचीत-बहुजन आघाडी च्या वतीने डफली वाजून बंद असलेली सार्वजनिक वाहतुक सेवा व व्यवसाय सुरू करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधले.
वंचीत -बहुजन आघाडी चे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नागपूर ग्रामीण विलास वाटकर,महासचिव नितेश जंगले,नागपूर पंचायत समिती चे सदस्य सुधीर करंजीकर यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने वाडी,लावा,दौलामेटी,वडधामना,इ.परिसरातून मोठ्या संख्येने वाडीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्ध प्रतिमा परिसरात झेंडे,फलक घेऊन उपस्थित झाले.या ठिकानि माल्यार्पण करून शासनाच्या विरोधात तीव्र निषेध घोषणा देण्यात आल्या.
उपस्थितांना जिल्हाध्यक्ष विलास वाटकर व महासचिव नितेश जंगले यांनी सांगितले की करोना महामारी व लोकडाऊन नियमांमुळे गत 4 महिन्यापासून सर्व व्यवसाय,मजुरी ,दुकाने,ऑटो,बसेस इ बंद असल्याने गरीब ,मजूर,खाजगी नौकरदार यांची परिस्थिती अत्यन्त चिंताजनक झाली असून,जीवन जगणे कठीण झाले आहे.करोना पेक्षा उपासमारी व बेरोजगारी ने मारण्याची पाळी आली आहे.शासन,प्रशासन,पोलीस म्हणते घरातच राहा.मग जगायचे कसे?नुकतेच शासनाने लोकडाऊन काही प्रमाणात शिथिल करून काही व्यवसाय व अत्यावश्यक सेवा देणारी वाहने सुरू करु देण्याची परवानगी अटी वर दिली आहे.मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवसाय व अन्य काही व्यवसाय बंदच ठेवल्याने त्याचेशी सम्बधित कर्मचारी व अवलंबून कामगार यांची बिकट अवस्था आहे.शासनाने त्वरित सर्व व्यवहार सुरू करावे व मग आरोग्य यंत्रणा मजबुत करून उपचार करावे अशी मागणी केली.
त्या नंतर वंचीत बहुजन आघाडी चे पदाधिकारी राजेश जंगले, अतुल शेंडे, रोशन मेश्राम, सूरज वानखेडे, मिलींद मेश्राम, विवेक शेवाळे, रोहित राऊत, सोनू बोरकर, गणेश नितनवरे, समीर सहारे, सूरज वानखेडे, नितीन रामटेके तसेच वंचित बहुजन आघाडी हिंगणा , दवलामेटी आणि वाडी चे कार्यकर्ते व महिला आघाडी पदाधिकारी इ.आपल्या मागण्याच्या समर्थमार्थ घोषणा देत नागपूरला रवाना झाले.